सेतू केंद्रात मनमानी पद्धतीने पैसे आकारणी

0

शहादा । नुकताच 10वी व 12वीचा निकाला लागला असुन विद्यार्थि व पालकांची सेतु मध्ये वेगवेगळी दाखले मिळविण्यासाठी एकच झुबळ सुरू आहे. माञ सेतु मध्ये कार्यरत वेंडर जवळील रायटर पालकांकडुन मनमानी पद्धतीने पैसे आकारणी करत आहेत.10वी व 12वीचा निकालानंतर विद्यार्थि इंजिनेरींग,मेडीकल, फार्मसी, अँग्री, शेतकी,आय टी आय आदि शिक्षणासाठी कागदपञाची पुर्तता सेतूमधुन मिळत असते.जसे उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीनल ,शेती असल्याचा दाखला वगैरे. ते मिळण्यासाठी स्टँम्प वेंडर कडून फाँर्म भरून सेतु मध्ये जमा करावा लागतो.माञ स्टँम्प वेंडरांचे रायटर लिखाणाचे अतिरिक्त पैसे पालकांकडुन मनमानी पद्धतीने घेतात. पालक माञ मुलाच्या शिक्षणासाठी दाखला लवकर मिळावा,यासाठी न बोलता पैसे देतात.तरी संबधित अधिकार्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडुन होत आहे.