सेतू केंद्रावर शाळेत लागणार्‍या दाखल्यांसाठी गर्दी

0

नंदुरबार । येथील सेतू केंद्रावर विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची तोबा गर्दी होऊ लागली आहे, त्यामुळे तहसील कार्यालयात यात्रेचे स्वरूप आले आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आदी विविध प्रकारचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी धडपड करताना दिसत आहेत.

हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी सेतू केंद्रात रांगा लावून नोंदणीसाठी उभे राहू लागले आहेत.त्यांच्यासोबत पालकही येत असल्याने तहसीलदार कार्यालयाला यात्रेचे स्वरूप आले आहे.या विद्यार्थ्यांना मात्र दाखला मिळण्याची तीन आठवडेची तारीख देण्यात येत आहे.दाखले उशिरा मिळत असल्याने प्रवेशाला अडचणी येणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकार्‍यानी दाखले वेळेवर देण्याची सोय करावी,अशी मागणी विद्यार्थी व पालक यांनी केली आहे.