सेनवरील डॉक्युमेंट्रीला सेन्सॉरची कात्री

0

कोलकाता । ‘आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ नावाचा एक माहितीपट (डॉक्युमेट्री) सुप्रसिद्ध नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावर बनविण्यात आली असून केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाने (सीबीएफसी) या डॉक्युमेट्रीबाबत अजबच सूचना केली आहे. सीबीएफसीच्या म्हणण्यानुसार या डॉक्युमेट्रीतून ‘गाय’, ‘गुजरात’ आदी शब्द हटविण्याची सूचना दिग्दर्शकाला देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ‘आर्ग्युमेंटेटिव्ह
इंडियन’ ही डॉक्युमेट्री दिग्दर्शक सुमन घोष यांनी बनवली आहे. सुमन घोष हे स्वत:ही एक अर्थतज्ज्ञ आहेत. ही डॉक्युमेट्री कोलकातामध्ये प्रसारीत करण्यात येणार होती. अमर्त्य सेन यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही डॉक्युमेट्री आहे. पण या डॉक्युमेंट्रीतून गाय, गुजरात, हिंदू भारत, भारताचा हिंदुत्ववादी विचार हे शब्द काढून टाकण्यात यावेत अशा सुचना सीबीएफसीने घोष यांना दिल्या आहेत. सुमारे एक तास इतक्या कालावधीच्या या डॉक्युमेट्रीचे दोन भाग करण्यात आले आहेत.