पिंपरी : महापालिकेच्या वतीने नगरसेवकांसाठी राबविण्यात येणारी आरोग्य विमा योजना शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी नाकारली आहे. तसेच स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्या उषा मुंढे यांनी देखील आरोग्य विमा योजना नाकारली आहे. महापालिकेत 133 नगरसेवक आहेत.
ते आणि त्याच्या कुटुंबियांसाठी महापालिकेतर्फे विमा लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सात नगरसेवकांनी यापूर्वीच सवलत स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे. आता शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्य उषा मुंढे यांनीही आरोग्य विमा नाकारला आहे. त्यामुळे 110 अधिक पाच स्वीकृत अशा 115 नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे.