सेना नगरसेवकाचा राजीनामा मंजूर करा- राष्ट्रवादीची मागणी

0

कल्याण : महानगरपालिकेच्या गलथान कारभार सुरु असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी नगरसेवकाच्या पदाचा राजीमाना महापौर राजेंद्र देवळेकर व पालिका आयुक्तांना पाठवला होता मात्र म्हात्रे यांचा गहाळ राजीनामा झाल्याची याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.या वादात राष्ट्रवादीने उडी घेत आता हा राजीनामा आपल्या हाती लागला असून त्यांचा राजीमाना आयुक्तांनी मंजूर करावा अशी मागणी केली आहे. पालिका अधिकाऱ्यांना जाग येईल आणि शहराचा विकास होईल असे यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष सुधीर पाटील यांनी यावेळी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत अनेक वर्षापासून शिवसेना – भाजपाची सत्ता असून ही पालिका प्रशासनाचा भष्ट्र कारभार सुरु असल्याचा आरोप केला याबाबत त्यानि अनेकदा पालिकेच्या कामकाजावर नाराजी दर्शवत उपोषण केले आहेत.

यावेळी वामन म्हात्रे यांनी महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून याबाबत वारंवार याबाबत महासभेत आवाज उठविल्या नंतरहि आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो , आपल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी आपली बाजू घेत नाहीत , पालिकेतील टक्केवारीच्या राजकारणाला कंटाळलो असल्याची खंत व्यक्त करत नगरसेवक असतानाही जर लोकांची कामे मार्गी लागत नसतील आणि आपल्या प्रभागातील नागरिकावर अन्याय होत असल्याने आपण उद्विग्न होत आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे सुपुर्द केला असून आपला राजीनामा मजूर करण्याची मागणी डोंबिवली प्स्चीमेक्डील नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केली होती . तर त्यानंतर हा राजीनामा गहाळ झाल्याची चर्चा रंगल्याने प्रत्यक्षात हा राजीमाना कुठे गायब झाला असा प्रश्न सर्वाना पडला आहे. मात्र याचे उत्तर राष्ट्रवादीकडे असून सदर राजीमाना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांना मिळाला आहे.सोमवारी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर भोईर , डोंबिवली कार्याध्यक्ष राजेंद्र नादोस्कर, सरचिटणीस जगदीश ठाकूर,उपाध्यक्ष प्रसन्न आचलकर , जयदीप सरवदे , ज्ञानेश पवार, शैलेंद्र भोजने, सुरेश भोसले आणि आनंद ठाकूर यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांचा राजीमाना दिला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष सुधीर वंडार पाटील म्हणाले , नाट्यमयरित्या नगरसेवक म्हात्रे यांनी राजीमाना दिला होता मात्र तो गहाळ झाल्याची चर्चा होती आम्हाला तो राजीनामा।सापडल्याने तो राजीनामा आम्ही पालिकेला दिले आहे. हा राजीमाना महापौर देवळेकर आणिया पालिका आयुक्त वेळूरासू यांनी मंजूर करावे अशी आमची मागणी आहे.