बीड । झाली तेवढी कटुता पुरे झाली, आता समन्वयाने यापुढे काम होईल. भाजप आणि शिवसेनेला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे दोघे एकत्र येणार नाही तर काँग्रेससोबत एकत्र येणार का? असे म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप मुंबईत एकत्र येतील, असे संकेत दिले. भाजपला राज्यभर यश मिळाले.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस क्षुल्लक मुद्दे बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येतील, महापालिकेत आम्ही सम-समान आहोत. त्यामुळे पारदर्शकता हा मुद्दा कायम ठेवून यापुढेही वाटचाल सुरु राहील, शिवसेना-भाजपमधील समन्वयाचें काम आवडीने करेन, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. अमित शहा यांच्याशी चंद्रकांत पाटलांची असलेली जवळीक सर्वश्रृत असल्याने त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचा भाजपच्या दुसर्या फळीतील नेते गांर्भियाने विचार करतील असे कार्यकर्ते म्हणत आहेत.