घाटकोपर मध्ये शिवनेर मराठा सहकारी पतपेढीवर चोराचा डल्ला

0

घाटकोपर | पश्चिम भटवाडी , राम जोशी मार्गावरील शिवनेर मराठा सहकारी पतपेढीवर काल ( दि 22) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने डल्ला टाकत पतपेढीतील तिजोरोतील एकूण 7 ,500 रुपयांची रक्कम पोबारा केली . मध्य रात्रीच्या सुमारास धो धो कोसळणारा पाऊस आणि सामसूम रस्त्याचा अंदाज घेत चोराने शक्कल लढवत पतपेढीचे कुलूप तोडून पतपेढीच्या आत प्रवेश करत मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता तिजोरीत केवळ 7,500 रुपयांची रक्कमच चोराच्या हाती लागली .

मिळालेली माहिती अशी की पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव गायकवाड हे आज ( दि 23 ) सकाळी 9 च्या सुमारास पतपेढी सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना पतपेढीच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे दिसताच त्यांनी या घटनेची घाटकोपर चिरागनगर पोलिसांना माहिती दिली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत अज्ञात चोरा विरद्ध भादंवि कलम 454 , 380 , 427 आणि 450 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे . पोलीस निरीक्षक दातार या घटनेची चौकशी करत आहेत . पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतले असता त्यांनी सांगितले कि पतपेढीच्या तिजोरीत केवळ 7500 रुपये रक्कम होती . शनिवारी आणि रविवारी पतपेढीच्या तिजोरीत रक्कम जास्त असते कारण त्यावेळेस सभासदांची वसुली मोठ्या प्रमाणावर होते . शनिवार किंवा रविवारच्या दरम्यान जर अशी घटना घडली असती तर मोठे नुकसान झाले असते . सुदैवाने मोठे नुकसान टळले अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली .