सेनेकडून दुकानांच्या पाटया मराठीत करण्यासाठी ३० जूनचे अल्टीमेटम

0

मुंबई-मराठीच्या मुद्दयावर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुकानांच्या पाटया मराठीत करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत दुकानांच्या पाटया मराठीत केल्या नाहीत तर दुकानांच्या पाटयाना काळे फासण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

मराठी पाटयांचा मूळ मुद्दा शिवसेनेचा आहे. मध्यंतरी मनसेने हा मुद्दा हायजॅक करुन शिवसेनेची कोंडी केली होती. शिवसेनेने स्थापनेच्यावेळी मराठी पाटयांचा विषय हाती घेतला होता.