सेनेचा चायना मालावर बहिष्कार

0

धुळे । भारत -चीन युद्ध झालेच तर ते दोन्हीही देशांना परवडणारे नाही. त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. म्हणून चीनला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी चीनी मालावरच बहिष्कार टाकावा. भारत-चीन सीमेवर काहीही कारण नसतांना चीनने डोकलाम सीमेवर आपले सैन्यदल आणून भारतावर दबाव टाकण्याचा अट्टाहास चालविला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या मनात चीनच्या भूमिकेने तीव्र संताप निर्माण केला आहे. चिनच्या आर्थिक नाड्या आवळाव्या म्हणजे चीनच्या लष्करी खर्चात कपात होईल व चीन भारतापुढे नांगी टाकेल असे आवाहन शिवसेनेने केले आहे. त्यासाठी मंगळवारी शहरातून भव्य निषेध फेरी काढून जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक मुसक्या आवळा
आशिया खंडातील भारत ही चीनची एकमेव अशी बाजारपेठ आहे जेथे चिनीवस्तु मोठ्या प्रमाणात विकले जातात. यामुळे चिनची आर्थिक स्थिती अधिक बळकट होत आहे. जीचा वापर आज भारताच्या विरोधात केला जात आहे व भारतीय सैनिकांच्या जीवावर उठतो आहे. भारतीय बाजारपेठेत चिनच्या आर्थिक मुसक्या आवळणे ही भारताची निकडाची गरज झालेली आहे. अन्यथा चीन सोबत युद्ध झाल्यास भारताला म्हणजेच प्रत्येक नागरिकाला मोठ्या प्रमाणात या युद्धाची झळ बसणार आहे. म्हणून आजच जागे व्हा. म्हणून बंद करा चिनी वस्तुंची खरेदी करणे, अभिमान बाळगा, चीनला धडा शिकवू या असे आवाहन करण्यात आले.

जिल्हाप्रमुख माळींच्या नेतृत्वात रॅली : या निषेध फेरीमध्ये जिल्हाप्रमूख हिलाल माळी, महानगरप्रमुख सतीश महाले, हेमंत साळुंखे, महेश मिस्तरी, डॉ. माधुरी बाफना, बापू शार्दुल, भगवान करनाकळ, गंगाधर माळी, प्रा. शरद पाटील, अतुल सोनवणे, भुपेंद्र लहामगे, कैलास मराठे, राजेंद्र पाटील, संजय गुजराथी, सुनिल बैसाणे, अ‍ॅड. पंकज गोरे, नरेंद्र अहिरे, पुरुषोत्तम जाधव, किरण जोंधळे, प्रमोद चौधरी, अ‍ॅड. राजेंद्र गुजराथी, दिनेश पाटील, कविता क्षीरसागर, हेमाताई हेमाडे, वंदना पाटील आदी असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारतीय सैनिकांना त्रास
भारत आणि चीन डोकलाम सिमेवर चिनच्या आडमुठ्ठे भूमिकेमुळे भारतीय सैनिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. भारतीय सैनिकांना 24 तास जीवाची पर्वा न करता उभे राहून चीनी सैनिकांना रोखण्याचे काम करावे लागते. सैनिक प्रेमाने समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु चीनी सैनिक अहंकारीपणे भारतीय सैनिकांसोबत वागत आहेत. डोकलाम सिमेवर हा वाद सुरु असून आपले सैनिक संघर्ष करीत आहेत. भारतीय नागरिक चीनी वस्तु स्वस्त दराने भेटतात म्हणून त्या खरेदी करण्याचा मोह बाळगून एक प्रकारे चीनची र्थव्यवस्था बळकट करतो आहे याचा निषेध या रॅलीतून करण्यात आला.