जळगाव- महानगरपालिकेची निवडणुक संपली असून आता लोकसभेच्या तयारीला सुरूवात करा, आतापासूनच संघटन मजबुत करण्यासाठी सुरूवात करा, अशा सुचना शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावत यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना तसेच पदधिकारी दिल्या.
शहरातील पद्मालय विश्रामगृहात विजयी व पराभुत उमेदांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांची संपर्क प्रमुख संजय सावंत, सहाय्यक संपर्क प्रमुख आर.ओ.पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शाम सोनवणे, नितीन लढ्ढा, सुनील महाजन, बंटी जोशी, मनोज चौधरी नितीन बरडे यांच्यासह पराभुत उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
सावंत यांनी विजयी व पराभुत उमेदवारांकडून शहरातील १९ प्रभागांची माहिती घेतली. त्यानंतर पराभवाच्या कारणासंदर्भात उमेदवारांशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी प्रत्येक उमेदवारांनी इव्हीएम घोटाळा, धनशक्ती यासह विविध कारणे सांगितली.
कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्त करणार
मनपा निवडणुक आटोपली असून आता लवकरच लोकसभा निवडणुक जाहिर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी तयारीला लागावे, दरम्यान, यंदा लोकसभेसाठी कार्यक्षम पदाधिकाºयांची नियुक्ती करणार असल्याची माहिती सावंत यांनी उपस्थितांना दिली. तोच लोकसभेसाठी आऱओ़पाटील यांचे नाव बैठकीतून समोर आले.