सेन्सेक्सची ऐतिहासिक भरारी

0

मुंबई ।  मुंबई शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. 456 अंकांनी उसळी घेत सेन्सेक्स 30,750 अंकावर बंद झाला. त्यापूर्वी सेन्सेक्स 30,768 अंकापर्यंत पोहोचला होता.

त्यामुळे सेन्सेक्सने गाठलेला हा आजवरचा सर्वात मोठा टप्पा आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीतही 149 अंकांची वाढ होऊन तो 9500 अंकावर बंद झाला. दरम्यान, आज शेअर मार्केटमध्ये आयटी कंपन्या इन्फोसिस, टीसीएससह लार्सन अँड टर्बो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी उसळी घेतली. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री सुरू आहे. त्यातच आता मुंबई शेअर बाजाराने उसळी घेतल्याने सेन्सेक्स आणखी मजबूत झाला आहे.