सेन्सेक्स आणि निफ्टीत उसळी

0

मुंबई – जागतिक बाजारपेठेतील बदलाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. दिवसाच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सने उसळी घेतली असून, सेन्सेक्स ३५ हजार ६४४.०५ अंकावर पोहोचला आहे. कालच्या ३५ हजार ५४७.३३ अंकात आज जवळपास १०० अंकाची वाढ झाली.

सेन्सेक्स पाठोपाठ निप्टीही तेजीत आहे. कालच्या १० हजार ७७२.०५ अंकामध्ये २६.७५ अकांची वाढ होऊन निप्टी १० हजार ७९८.८० अंकावर पोहोचली. निफ्टीत ०.२४ टक्के वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.