नवी दिल्ली- जागतिक बाजारातील तेजी, कच्च्या तेलाच्या किमतीतील अल्प प्रमाणात आलेली नरमाई आणि रुपया करत असलेले रिकव्हरीमुळे आज शेअर मार्केट मध्ये चांगली तेजी आहे. आज बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअरमार्केट मध्ये तेजी दिसून आल्याने सेन्सेक्समध्ये २२५ अंकांनी वाढ झाले आहे. २२५ अंकाच्या तेजीसह सेन्सेक्स ३६ हजार ७४५ अंकावर पोहोचले आहे. सोबतच निफ्टी ६६ अंकानी वधारले आहे. निफ्टी ६६ अंकाच्या तेजीसह ११ हजार ७४ अंकावर पोहोचले आहे. मंगळवारी शेअर मार्केट तेजीसह बंद झाले होते.
अडानी पोर्ट्स, बीपीसीएल, डॉ.रेड्डी, आईओसी, एचडीएफसी, आईओबी, आईसीआईएल, सिंटेक्स, कॉरपोरेशन या शेअर चांगल्या स्थितीत आहे. तर वकरांगी, ल्यूपिन, वेदांता, अशोक लेलैंड, हाथवे, पराग मिल्क आणि रिलायंस कैपिटलमध्ये घसरण पहावयास मिळत आहे.