मुंबई-रिलायन्स इंडट्रीज, एचडीएफसी, एक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी बँकेच्या शेअर खरेदीमुळे सेन्सेक्स ५० अंकांनी मजबूत झाला आहे. तर निफ्टी ११ हजार ६०० च्या जवळ पोहोचले आहे. बँकिंग आणि रियल्टी शेअरमध्ये तेजी असल्याने बाजाराला मोठा पाठबळ मिळत आहे. दरम्यान सेंसेक्स ०.१३ टक्के आणि निफ्टी ०.१२ टक्क्यांनी वाढून कामकाज करीत आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर
कामकाजा दरम्यान लार्जकॅपच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर अधिक विकले गेले. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स ०.११ टक्के वाढले तर निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्सवर समान आहे.