न्यूयॉर्क । अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा ‘मम्मी’ बनल्यानंतर निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. यंदाच्या मोसमात ती यापुढे खेळणार नाही, पण पुढील वर्षी खेळण्यास ती उत्सुक आहे. तिचे फ्रेंच प्रशिक्षक पॅट्रिक मौरातोग्लोऊ यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले. सेरेनाने गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर टेनिस जगतात चर्चा सुरू आहे. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना तिला दुसरा महिना सुरू होता हेसुद्धा स्पष्ट झाले. सेरेना 35 वर्षांची आहे. ऍलेक्स ओहानियन याच्याशी तिचा अलीकडेच वागनिश्चय झाला.
नस्तासेच्या व्यक्तव्यामुळे वाद
विसावा आठवडा सुरू असल्याचे तिने अलीकडेच जाहीर केले. येत्या सप्टेंबरमध्ये ती ‘मम्मा’ बनण्याची अपेक्षा आहे. सेरेनाच्या प्रकाशक केली बुश नोव्हाक यांनी पॅट्रिक यांचा हवाला दिला आहे. पुढील वर्षी पुनरागमन केव्हा करू याचा सेरेना या घडीला अकारण फार विचार करीत नाही. तिला कारकीर्द मात्र थांबवायची नाही. आपण अजूनही वर्चस्व गाजवू शकतो, असा विश्वास तिला वाटतो.
दरम्यान, रुमानियाचे एक काळ गाजविलेले टेनिसपटू इली नस्तासे यांनी वर्णभेदी टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉन्संटा येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, ‘सेरेनाचे बाळ कोणत्या रंगाचे असेल याची उत्सुकता असल्याचे सांगण्यात आले होते.