सेलेब्रिटींमध्ये दबंगच श्रीमंत

0

मुंबई : बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान पुन्हा एकदा फोर्ब्स इंडियाच्या श्रीमंत सेलिब्रेटीमध्ये सर्वात श्रीमंत ठरला आहे. १०० सेलिब्रिटींच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दबंग खान सलग ३ वर्षापासून पहिल्याच क्रमांकावर आहे.

बघा फोर्ब्सची यादी 

फोर्ब्स इंडियाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर भारतीय क्रिकेटर विराट कोहली आहे. ज्याची एकूण कमाई २२८.०९ कोटी आहे. तिसऱ्या क्रमांकावर खिलाडी अक्षय कुमार आहे. त्याने यावर्षी १८५ कोटींची कमाई केली आहे. गेल्या वर्षी शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर होता, मात्र यावेळी तो सरळ १३ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.