सेल्फीने नातं संपलं

0

वॉशिंग्टन | अमेरिकेतील एका महिलेने आपल्या घटस्फोटाबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत काढलेल्या सेल्फीला जबाबदार धरले आहे. फ्लोरिडाच्या पाम बिच काउंटी मध्ये रहाणाऱ्या लिन या महिलेचा प्रसिद्ध वकील डेव एरनबर्ग यांच्याशी घटस्फोट झाला.

चीअर गर्ल लिनने रिपब्लिकन पार्टीला समर्थन दिले आणि ट्रम्प यांच्यासोबत मनोसोक्त सेल्फीही काढल्या. आपले पती डेमोक्रॅट पार्टीचे समर्थक आहेत. खरं तर त्यांना रिपब्लिकनांनी मदत करून सरकारी अधिवक्ता बनवले. आमचे पक्ष भिन्न आहेत म्हणून आम्ही दुरावलो नाही, असं लिन सांगते. क्लबमध्ये ट्रम्प दिसले की सेल्फी अनावर व्हायची. माझे पती म्हणायचे असं करू नको. पण सेल्फीबाजी थांबली नाही. सेल्फी घेऊन ती मी पतीला पोस्ट करायचे, ही माझी चुकच झाली. तेही नंतर नंतर सांगायला लागलेले की सेल्फी घेतेस ती घे पण निदान मला तरी पोस्ट करू नको. शेवटी व्हायचं ते झालंच लिनला सेल्फीमुळे घटस्फोट मिळाला…तिला बीएमडब्ल्यू गाडी, हजोरो डॉलरही मिळाले…सेल्फीमुळे नवरा मात्र गमावला.