सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजने अंतर्गत मिळणार लाभ

0
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेत 12 ते 24 वर्षे त्याहून अधिक सेवा झालेल्या आजी-माजी कर्माचार्‍यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजने अंतर्गत 76 कर्माचार्‍यांना 12 लाख 56 हजार रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. या योजने अंतर्गत 76 कर्माचार्‍यांना त्यांच्या सेवा आणि पदानुसार सुमारे 20 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंतची रक्कम फरकापोटी अदा करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थिंची यावर्षीची दिवाळी जोरात होणार असल्याची कर्माचार्‍यांची भावना आहे. या कामी मुख्याधिकारी वैभव आवारे लेखापाल ज्ञानेश्‍वर मोहिते, प्रशासकीय अधिकारी भास्कर वाघमारे, लोणावळा नगर पालिकेचे माजी उपमुख्याधिकारी दिलीप गायकवाड यांचा कर्मचार्‍यांनी विशेष सत्कार केला. या प्रसंगी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, नगरसेवक अरुण माने, आनंद भेगडे, उपस्थित होते. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप वाडेकर, हनुमंत बोरकर, रवींद्र काळोखे, शामराव गराडे, संभाजी भेगडे, आदी कर्मचारी उपस्थित होते. येथून पुढे प्रत्येक कर्माचार्‍याला दरमहा 1500 ते 2500 पर्यंतची रक्कम दरमहा वाढून मिळणार आहे. तर सेवानिवृतांना आठशे ते एक हजारपर्यंत दरमहा मिळणार आहे.