सेवाकर राष्ट्राच्या प्रगतीसाठी फायदेशीर

0

जळगाव। जळगाव सी.ए. शाखेच्या आय.सी.ए.आय. भवन येथे जळगाव सी.ए. शाखा, सेवा कर विभाग, जळगाव व जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वस्तू व सेवा कर यावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सेवा कर जळगाव चे उपायुक्त श्री. व्ही. तोताडे, श्री. एस. निकाले तसेच धुळे विभागाचे उपायुक्त श्री. एन. तडवी तसेच जळगाव सी.ए. शाखेचे माजी अध्यक्ष सी.ए. नितीन झवर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

जनजागृती झाली पाहिजे.
सी. ए शाखेच्या आयोजित कार्यशाळेत सेवाकर अधिकारी श्री. आर. बी. बाविस्कर यांनी वस्तू व सेवा कर यावर उपस्थित व्यापारी वर्गाला विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वस्तू व सेवा कर यामुळे व्यापाराचे तसेच जनसामान्यांचे होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. तसेच वस्तू व सेवा कर मधील बारकावे यावेळी सांगण्यात आले. त्याच प्रमाणे एक राष्ट्र एक कर आपल्या व्यापाराकरिता तसेच आपल्या राष्ट्राच्या प्रगत्ती करीता कसे फायदेशीर असून याबाबत जनजागृती होणे महत्वाचे आहे. व्यापारी वर्गाने नियमित कर भरल्यास देशाची तिजोरी मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यामध्ये राष्ट्र विकास शक्य आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव सी.ए. शाखेच्या अध्यक्षा सी.ए. पल्लवी मयूर, खजिनदार सी.ए. सागर पटनी, सदस्य सी.ए. पंकज अग्रवाल, माजी अध्यक्ष सी.ए. नितीन झवर तसेच सेवा कर जळगाव विभागाचे आयुक्त श्री. किशोर पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.