जळगाव। सेवाकलाविष्कार कार्यक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील कला क्षेत्रात क्रांती होणार आणि त्यामुळे सेवा आणि कला क्षेत्राचा सुरेख संगम जळगावकराना पहावायला मिळणार आहे. रेडक्रॉसचा हा उपक्रम स्तुत्य आहे असे गौरवोद्गार डिवायएसपी सचिन सांगळे यांनी काढले. जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त सोमवारी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सेवाकलाविष्कार कार्यक्रमाचा लोगो आज प्रकाशित करण्यात आला. यावेळी तेे बोलत होते. भाऊंचे उद्यान येथे सेवाकलाविष्कार बोधचिन्ह पोस्टरचे डिवायएसपी सचिन सांगळे आणि कला शिक्षक हस्ते प्रकाशन झाले.
डिवायएसपी सचिन सांगळेंची प्रमुख उपस्थिती
रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, सहसचिव राजेश यावलकर, चेअरमन रक्तपेढी डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, जी.टी. महाजन, विकास मल्हारा व चित्रकार प्रा. सचिन मुसले, प्रा.निरंजन शेलार, आशीष जगताप, प्रेम कुमार सपकाळे, मनोज जंजाजळकर, योगेश सुतार, श्री. शाम कुमावत, दाभाडे सर, विजय जैन, सुशील चौधरी, राजू बावीस्कर, तरुण भाटे, प्रदीप पवार, सुबोध सराफ, मिलिंद पाटील व रेडक्रॉसचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी,जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा उपस्थित होते.
भव्य कलाकृती साकारली जाणार
काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान व उद्यान समोरील रस्त्याच्या पश्चिमेकडे भिंतीच्या लगत रस्त्याच्याबाजूने 3 फूट ऊंचीचे 1000 फुट लांब सरळ महाबळ रोड पर्यंत बँनर कापड लावले जाणार आहे. त्यावर या सर्व कलाकारांना आपली कला सादर करता येणार आहे. एकाचवेळी 300 निवडक नामवंत चित्रकार आपली कला सादर करणार आहे. तसेच 1 ली ते 4 थी, 5 वी ते 8 वी व 9 वी ते 12 वी पर्यन्तचे विद्यार्थी चित्र रंगवणे व चित्र काढणे कला सादर करणार आहे.