भुसावळ : डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसमधून उतरताना रेल्वे प्रवाशाच्या खिशातील 17 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना भुसावळ रेल्वे स्थानकावर 5 रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शाकिब हुसेन अख्तर हुसेन (22, सिद्धी कॅम्प, खदान, अकोला) यास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तक्रारदार अनिल लक्ष्मीकांत कोळी (भुसावळ) हे 5 राजी डाऊन सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून उतरत असताना त्यांचा मोबाईल चोरीला गेला होता. पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार श्रीकृष्ण निकम यांनी आरोपीला अटक करीत मोबाईल हस्तगत केला.