भुसावळ । पालिकेच्या सेवेतून नंदा रमेश कडेरे सफाई कर्मचारी म्हणून 30 जून 2016 रोजी निवृत्त झाल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यांची निवृत्ती रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने रक्कम त्वरीत अदा करावी, अशी मागणी कंडेरे यांचे सुपूत्र सुनील कडेरे (रा.वाल्मीकनगर) यांनी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर याच्यांकडे केली.
कडेरे यांच्यानंतर निवृत्त झालेल्या तसेच राजीनामा देणार्या कर्मचार्यांना पालिकेने रक्कम अदा केली आहे. मात्र, कडेरे यांची रक्कम अडवून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मुख्याधिकारी बाविस्कर व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याकडे समस्या मांडूनही उपयोग झालेले नाही, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे प्राताधिकार्यांनी पाठपुरावा करून समस्या दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.