सेवानिवृत्तीनंतरही सुशिक्षित व सृजनशील समाज घडवण्याची जवाबदारी शिक्षकांची

0

माजी आमदार शिरीष चौधरी : रावेरला सेवापूर्ती समारंभ

रावेर- शिक्षक सेवानिवृत्त झाले म्हणून त्यांची जबाबदारी संपली, असे नाही ज्या पध्दतीने शाळेत विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात तसेच सेवानिवृत्त झाल्यानंतर सुशिक्षित व सृजनशील समाज त्यांनी पुढे घडवत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. रावेर शिक्षण संवर्धक संघातर्फे शाळेच्या हॉल सेवापूर्ती गौरव समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, जिल्हा परीषद सदस्या रंजना पाटील, नंदा पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, नगरसेविका संगीता अग्रवाल, संगीता वाणी, संगीता महाजन, ग.स.च्या माजी सदस्य कल्पना पाटील, माजी नगरसेवक अनिल अग्रवाल, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक यशवंत दलाल, प्रेमचंद गांधी, रावेर शिक्षण संवर्धकचे अध्यक्ष अ.वि.रावेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मॅनेजमेंट सिस्टिमच्या शिस्तमुळे रावेरचे नावलौकीक ; प्रकाश मजूमदार
मॅनेजमेंट सिस्टिमच्या शिस्तमुळे रावेर शिक्षण संवर्धकावर रावेरकर व परीसरातील जनतेचा विश्वास आहे. यामध्ये शिक्षक सुध्दा विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वस्तर प्रयत्न करून विद्यार्थी घडवितात. शाळेमध्ये सध्या हायटेक संगणक कक्ष बौद्धिक, वकृत्व, खेळ या सर्वांमध्ये उत्तम शिक्षण देण्याचे काम आमच्या शाळेचे शिक्षक करतात या शाळेच्या अनेक विद्यार्थांनी भारतभर नाव केल्याचे प्रतिपादन रावेर शिक्षक संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मजूमदार यांनी आपल्या प्रस्तावनेत केले.