सेवानिवृत्त झालेल्यांचा महापौरांच्या सत्कार

0

पिंपरी ः प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अकरा अधिकारी व कर्मचार्‍यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्थायी समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, लेखपाल विजय साबळे, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे चारुशिला जोशी आदी उपस्थित होते. महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये मुख्याध्यापक दिनेश ढोबळे, गंगाराम दसगुडे, भांडारपाल अतुल आचार्य, कार्यालयीन अधिक्षक नंदा भोसले, वीज पर्यवेक्षक नंदकुमार गायकवाड, रखवालदार दिलीपकुमार जाधव तसेच चंद्रमणी ओव्हाळ यांचा समावेश आहे. तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्यांमध्ये लॅब टेक्निशियन सतीश गव्हाळे, सफाई कर्मचारी शोभा आव्हाड, लक्ष्मीबाई भालेराव, बाळकृष्ण परदेशीयांचा समावेश आहे. यावेळी महापौर नितीन काळजे,चारुशिला जोशी, मुख्याध्यापक दिनेश ढोबळे, गंगाराम दसगुडे, लेखपाल विजय साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्र संचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.