शहादा । सारंगखेडा ता.शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गावांमधील सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला. तोरखेडा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील होते. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, प. स. सदस्य गिरीश जगताप. पृयादर्शन कदमबांडे,माजी जि.प. सदस्य पंडित पाटील, पोलीस पाटील संघटनेचे विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, तालुकाध्यक्ष गजेंद्र गोसावी, सचिव सुरेश गोसावी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक पाटील उपस्थित होते. पोलीस पाटील प्रकाश (बोराळा), भास्कर बोरसे (कळंबू), प्रतापसिंग गिरासे ( सावळदा), भानुदास पाटील (कुकावल), प्रतापसिंग गिरासे (अनरद) यांनी आपापल्या गावांमध्ये पोलीस पाटील म्हणून चांगली सेवा दिली. वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले या पाच हि पोलीस पाटलांचा पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सत्कार केला.यावेळी बोलतांना पोलीस उपअधीक्षक एम.बी.पाटील यांनी पोलीस पाटील हा शासनाचा पोलीस प्रशासनाचा महत्वाचा दुवा आहे. त्यांचा कामाचा अनुभव प्रशासनाला उपयोगी ठरतो. प्रत्येक कामात त्यांची भूमिका महत्वाची असते.