सेवानिवृत्त पोस्ट मास्तरला मारहाण : 8 जणांविरूध्द गुन्हा

यावल : शहरातील एका 80 वर्षीय सेवानिवृत्त पोस्ट मास्तरला प्रार्थनास्थळाची पैशांच्या हिशोबावरुन 8 जणांनी मारहाण केल्याची घटना शनि.वारी सायंकाळी घडली. या प्रकरणी उशीरा यावल पोलिसात दंगली सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील लोकेश नगराततील रहिवासी सेवानिवृत्त पोस्ट मास्तर सुभान जमशेर तडवी (80) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते शुक्रवारी कॉलनीतील सुलेमान फकिरा तडवी यांच्याकडे ईदनिमित्त भेटण्यासाठी गेले असता तेथे मनोज लुकमान तडवी यांच्यासोबत मशीदच्या पैशांच्या हिशोबावरुन बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा राग मनात ठेवुन शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मनोज लुकमान तडवी, मुक्तार फकिरा तडवी, लुकमान फकिरा तडवी, सखावत याकुब तडवी, शकिल लुकमान तडवी, लुकमान तडवी यांची पत्नी (पूर्ण नाव माहीत नाही), जुलेखा मुक्तार तडवी व जोहरा याकुब तडवी (सर्व रा.यावल) यांनी फिर्यादी यांना जबर मारहाण केली. यात त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली. संशयीतांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सर्व आठ जणांविरूध्द यावल पोलिसात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निारीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.