10,000 extended from a woman who came to collect pension in Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील मुख्य स्टेट बँक शाखेत पेन्शन काढण्यासाठी आलेल्या महिलेच्या हातातील हजारांची रक्कम भामट्याने लांबवल्याची घटना मंगळवार, 6 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
तक्रारदार तथा सेवानिवृत्त कर्मचारी बेगमबी अब्दुल शेख (65, जाम मोहल्ला, मशिदीजवळ, भुसावळ) या जामनेर रोडवरील स्टेट बँकेत पेन्शन काढण्यासाठी मंगळवारी दुपारी चार वाजता आल्यानंतर अंगात लाल रंगाचे टी शर्ट घातलेल्या 30 वर्षीय तरुणाने नोटांचे क्रमांक लिहून नोटा परत देतो म्हणून दहा हजारांची रक्कम घेत हातचलाखीने रक्कम लंपास केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर करीत आहेत.