जळगाव। भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील शाळेच्या खोलीत सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरी पंडीत पाटील (वय 60) यांनी गुरूवारी सकाळी गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांना आत्महत्येनंतर सुसाईड नोट मिळून आली असून त्यात शिक्षक व शालेय समितीच्या अध्यक्षावर आरोप करण्यात आले आहे.
मयत हरी पाटील हे या शाळेचे संचालक होते. शाळाचा दर्जा सुधारावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु होते. दोन वषार्पूर्वी लोणी ता. पारोळा येथून सेवानिवृत्त झाल्यावर जुवार्डी येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. जिल्हाधिकारी, न्यायधीश आणि धर्मदाय आयुक्त यांच्या नावाने ही सुसाईड नोट लिहीली आहे. 4 पानांची ही नोट असून यामध्ये म्हटले आहे की, वसंत पाटील हे दोन व्यक्ती आत्महत्येस जबाबदार आहे.