अमळनेर : येथील 2012 पासून अमळनेर मधील 115 प्रा.शी. मंडळाच्या सेवा निवृत्ती झालेल्या शिक्षकांना शासन निर्देशानुसार फरक न मिळाल्याने 26 जानेवारी 2018 रोजी लाक्षणिक उपोषण सहित थाळी बाजाव अदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे तालुकाअध्यक्ष अनंत निकम यांनी मुख्यमत्र्यांना निवेदन दिले आहे. निवृत्ती शिक्षकांना लवकरात लवकर निवडश्रेणी फरक न मिळाल्यास नाईलाजास्तव संभाजी ब्रिगेड निवृत्ती शिक्षकांना घेऊन 26 जानेवारी 2018रोजी तहसील आवारात तिरंग्याला वंदन करून तहसील आवारातच एक दिवशीय लाक्षणिक उपोषण तसेच थाळी बाजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान वय वर्षें 70-85 वयाचे वृद्ध शिक्षकांच्या प्रकृतीस काही झाल्यास त्यास शासन जबाबदार राहणार याची गांभीर्याने नोद घ्यावी असे आवाहन केले.
संभाजी ब्रिगेडने काय म्हटले आहे निवेदनात?
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सेवानिवृत्त कर्मचारी शहरातील स्कुलबोर्डच्या कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे मिळतात. या शिक्षकांनी पिढ्या घडवल्या त्या शिक्षकांवर अशी वेळ येणे म्हणजे सरकारच्या पारदर्शी कारभाराला तळा जाणेच आहे. सरकार रोज जनतेच्या हिताच्या नवीन योजना आणून जनतेच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी धडपडत आहे,पण सरकारी योजनेचा लाभ न मिळुदेता सरकारला बदनाम करण्याचे कार्य काही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कळून होतांना दिसत आहे. तरी आपल्या पारदर्शी कारभारात अमळनेरचे 115 हयात असलेले सेवा निवृत्त शिक्षक आपली सरकारची फरक देण्याची इच्छा असूनही लाभा पासून वंचित आहे. आपण पारदर्शी कारभाराचे प्रणेते आहात तसेच कार्यकुशल मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात तसेच दिल्लीत आपली ख्याती आहे. यावरून आम्ही आशा करतो निवेदन हाती पडताच आपण सकारात्मक पाऊले उचलून निवृत्ती शिक्षकांचा फरक तात्काळ देण्याची तरतूद करणार, असे झाल्यास अमळनेरचे निवृत्ती शिक्षक देखील गर्वाने म्हणतील ’व्हय मी लाभार्थी, हे माझे सरकार आहे.