सेवेत कायम करण्याचा दावा औद्यगिक न्यायालयाने फेटाळला

0

रावेर । तालुक्यातील लालमाती येथील रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणार्‍या वनमजुराने शासकीय सेवेत कायम करावे त्याचा असा दावा औद्यगिक न्यायालयाने रद्द केला आहे याबाबतची अशी माहिती वनविभागाने प्रसिद्धिपत्रका द्वारे केले दिली आहे. लालमाती येथील वसंत जाधव हे 1989 ते 98 या दरम्यान तुटक पद्धतीने रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवन संरक्षण मजूर म्हणून रोजंदारीने काम करीत होते.

शासनाच्या धोरणानुसार 1998 नंतर या योजनेचे काम संपुष्टात आल्याने त्यांना कामावरुन बंद करण्यात आले होते. या मजुराने शासकीय सेवेत कायम होण्यासाठी औद्योगिक न्यायालय जळगाव येथे शासनाच्या वन विभाग विरोधात दावा दाखल केला होता. या दाव्याचे न्यायालयाने दोन्ही बाजू विचारात घेऊन सुनावणीचे कामकाज झाले. निकाल म्हणून न्यायालयाने हा रद्दबातल केला आहे. वन विभागातर्फे अ‍ॅड. एस.जी. शर्मा यांनी काम पाहिले. दरम्यान, हे प्रकरण जुने असून वनविभागाने घेतलेले निर्णय योग्य आहे. न्यायालयाने वनविभागाच्या बाजुने दिलेल्या निर्णयाने हे सिध्द होत आहे. या प्रकरणासंदर्भात वेळोवेळी योग्य बाजू मांडली आहे त्यामुळेच निकाल वनविभागाच्या बाजूने लागला असल्याचे वनक्षेत्रपाल आर.जी. राणे यांनी सांगितले.