सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेचा समारोप

0

अंतिम लढतीत जैन स्पोर्टस्, बाहेती कॉलेज ठरले अजिंक्य

जळगाव  । जिल्हा फुटबॉल असो.आयोजित विविध संस्था व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सौजन्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर दोन दिवसापासून सुरु असलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुले व खुल्या गटातील मुलांच्या स्पर्धा झाल्या असून मुलींमध्ये जैन स्पोर्टस् तर मुलांमध्ये बाहेती कॉलेजने चषकासह ट्रॅकसुट मिळविले.

विजयी, उपविजयी तसेच वैयक्तिक बक्षीसे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, दलीचंद जैन, सौ.निशा जैन, नंदलाल गादिया, राष्ट्रीय खेळाडू माधुरी बेहरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मो.आबीद, फारुक शेख यांच्याहस्ते देण्यात आले.