सैनिकांच्या नावाने मत मागितल्याने मोदींविरोधात तक्रार; आयोगाने मागविला अहवाल !

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सरंक्षण दलाचा राजकीय पक्षाने वापर मते मिळविण्यासाठी करू नये असे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहे, असे असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरमधील औसा येथील प्रचारसभेत बालाकोट एअर स्ट्राइक आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने भाजपला मत द्यावे, असे आवाहन केले. मोदी राजकीय फायद्यासाठी शहीद जवानांच्या नावाचा वापर करत आहेत, असे म्हणत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला आहे.

औसा येथे पंतप्रधान मोदींची प्रचारसभा झाली. त्यात मोदींनी जवानांच्या नावाने नवमतदारांना मतदानाचे आवाहन केले होते.