सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींना व्हॉलीबॉलमध्ये यश

0

पिरंगुट । कासारआंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत तसेच जिल्हास्तरीय योगासन व रायफल शुटीग स्पर्धेत यश संपादन केले आहे. तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष वयोगटात त्यांनी अजिंक्यपद मिळवले आहे. जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत इयत्ता 11 वी मधील दिव्या निखाडे व सातवीमधील सायली बोंडगे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांची विभागीय पातळीवर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय शुटींग स्पर्धेत बारावीतील साक्षी गोसावी व नववीतील केशर गुरव यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. नववीतील श्वेता पाटील, अकरावीतील भार्गवी सुतार यांनी रौप्यपदक तर आठवीतील प्रज्ञा सूर्यवंशी, दहावीतील श्वेता राजगुरू, अकरावीतील शुभांगी मांडेकर यांना कांस्यपदक मिळाले आहे. या सातही विद्यार्थिनींची विभागस्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजेत्या विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक विश्वास गुरव, शीतल आराध्ये, चंद्रकांत बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी व शाळेच्या प्राचार्या पूजा जोग, क्रीडा विभाग प्रमुख संदीप पवार यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.