सैन्यदलाच्या आमिषाने अडीच लाखांचा गंडा

0

पिंपरी : भारतीय सैन्यदलात वाहन चालक पदावर नोकरी लावतो या अमिषाने तरुणाला अडीच लाखांचा गंडा घातला आहे. जून ते नोव्हेंबर या पाच महिन्याच्या कालावधीत आरोपीने ही फसवणूक केली आहे. या प्रकरणी प्रशांत भाऊराव पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपाळ पाचंगे (वय 25 रा.डांगे चौक थेरगाव) यांना आरोपी पाटील याने माझी सैन्यदलात ओळख आहे. मी तुम्हाला सैन्य दलात वाहन चालक या पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखविले. तसेच फिर्यादीचे शैक्षणीक कागदपत्रे व अडीच लाख रुपये घेतले मात्र अद्याप नोकरी लावली नाही. त्यामुळे पाटील याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मात्र मुळात सैन्य दलात पैसे देऊन नोकरी दिली जात नाही. कोणी असे आमिष दाखवत असेल तर वेळीच सावध व्हा व याची माहिती पोलिसांना द्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे.