सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; जवान शाहिद

0

श्रीगनगर-जम्मू-काश्मीरच्या बटमालू भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. तर तीन जवान जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे ही चकमक सुरु झाली ती अजूनही सुरुच आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे. येथे ३ दहशतवादी लपले असल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात ८ ऑगस्ट रोजी झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा रक्षकांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. येथील राफियाबाद भागात ही चकमक झाली होती. यामध्ये सुरक्षा रक्षकांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या कारवाईनंतर येथे मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात आली होती.