सैन्य दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला; स्थानिक नागरिक जखमी

0

श्रीनगर। जम्मू-कश्मीरच्या कुलगाम भागात सैन्य दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक स्थानिक नागरिक जखमी झाला आहे. सुरक्षा रक्षकांच्या प्रत्युत्तरानंतर दहशतवादी फरार झाले. आज सकाळी अचानक कुलगाममधील स्कॉस्ट रिसर्च सेंटर स्थित सैन्य दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यांतर तातडीने भारतीय सैन्याने त्यास प्रत्युत्तर दिले. अध्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.