सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गात 40 उमेदवारांची होणार निवड

0

धुळे । धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी 40 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पात्र स्त्री- पुरुष उमेदवारांनी शनिवार 1 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस कवायत मैदान, धुळे येथे उपस्थित राहावे, असे आवाहन के. जी. बागूल, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. प्रशिक्षणाच्या शर्ती व अटी पुढीलप्रमाणे उमेदवार हा फक्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातीलच असावा. त्याबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला व त्याची सत्यप्रत सोबत घेवून येणे. शाळा सोडल्याचा मूळ दाखला व साक्षांकित सत्यप्रत आणावी. प्रशिक्षणाचा कालावधी 90 दिवसांचा एचएससी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक व प्रमाणपत्र व साक्षांकित सत्यप्रत आणावी, उमेदवाराचे वय 18 पेक्षा अधिक व 25 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच तो शिक्षण अथवा नोकरी करीत नसावा.