जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथे होणार्या आगामी सैन्य दल भरती संदर्भात मू. जे. महाविद्यालयात कार्यक्रम झाला. या वेळी कर्नल एस. एस. कालिया यांनी एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
१८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल दिलीप पांडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी भारतीय सैन्य दलाची ओळख, सैन्य दलाच्या अपेक्षा याविषयी माहिती दिली. मेडीकल ऑफिसर कर्नल कार्तिक यांनी मेडीकल संदर्भातील माहिती दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी हे होते. लेफ्टनंट डॉ. नूतन राठोड यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी लेफ्टनंट गौतम भालेराव, लेफ्टनंट डॉ. बी. एन. केसूर, सीटीओ शिवराज पाटील, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डी. आर. वसावे व एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी उपस्थित होते.