सैन्य भरती फसवणुकीचा पुन्हा नविन रॅकेट उघडकीस

0

कळमडु परिसरात अनेक तरुणांना फटका,
संशयाची सुई श्रीरामपूरकडे;
मेहूनबारे ठाण्यात गुन्हा दाखल

चाळीसगाव । सैन्य दलात नोकरी लावून देण्याच्या पाचोर्‍यातील घटनेला अवघे काही तास लोटत नाही तो नवीन दलालचा पर्दाफाश झाला असून कलमडू गावातील तरुणाला हाताशी धरून नगरदेवला व्हाया श्रीरामपूर कनेक्शन उघडकीस आले आहे येथील चार युवकानी नोकरी च्या नावाखाली इतर राज्यात काही महिने थांबवून ठेवण्यात आले होते मात्र आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने मेहूनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय या टोळीने किती तरुणांची फसवणूक केली याबाबत तर्क वितर्क चर्चिले जात आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आज या फसवणूक झालेल्या कलमडूच्या तरुण दीपक केदार, सोमेश गायकवाड, प्रकाश पाटील, समाधान केदार यांनी चाळीसगाव विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र संबंधितटोळीचा दलाल असलेल्या गावातील सुधीर कैलास सोनवणे (वय-25, रा.कळमडू ता.चाळीसगाव) या तरुणाने संबंधित पालक व तरुणांना तुम्ही प्रसार माध्यमाकडे गेल्यास मी तुमचे पैसे देणार नाही अशी धमकी दिली. त्यामुळे या पत्रकार परिषद फसवणूक झालेले तरुण व त्यांचे नातेवाईकांनी रद्द केल्याने या प्रकरणाबाबत अधिक संशय बळावला होता पोलीस प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र अखेर दुपारी सुधीर तसेच त्याचे वडील कैलास उत्तम सोनवणे व या प्रकरणाचा मोहरक्या संजय लक्ष्मण अडकमोल (रा. नगरदेवला ता. पाचोरा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोर्‍यात दुसर्‍या टोळीची शक्यता
गेल्या तीन दिवसांपूर्वी सुभेदार हसनोद्दीन व त्यांच्या परिवारातील पत्नी व मुलास अटक।केली बहुसंख्य तरुणांची फसवणुकीतून त्यांनी वीस कोटी पेक्षा अधिक रक्कम या बेरोजगार युवकाकडून जमा केली असल्याची धक्का दायक माहिती समोर आली या घटनेचा उलगडा होत असतानाच नागरदेवल्याचा संजय अडकमोल याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आल्याने हस्नोद्दीन नंतर दुसर्‍या टोळीचे नाव समोर आले आहे त्यामुळे जिल्यात किती तरुणांना याची झळ पोहचली आहे हे लवकरच उधड होणार आहे या दोन टोळीनंतर आणखी अजून काही दलाल सक्रिय आहे अशी अशक्यता वर्तविली जात आहेफ

चौघांनी केली हिंमत
कलमडू येथील संशयित सुधीर सोनवणे हा गेल्या 4-5 महिने गायब होता तो जेव्हा गावात आला तेव्हा सैन्य दलाची वर्दी घालून आला आणि माझी नियुक्ती झाली असून नगरदेवळा येथील संजय अडकमोल यांनी माझे काम करून दिले म्हणून सांगू लागला. या विश्‍वास ठेवून त्यांनी या चार तरुणांकडून मध्यस्थी करीत दीपक केदारचे 1.5 लाख, समाधान केदारचे 2 लाख, सोमेश गायकवाडचे 1.5 लाख व प्रकाश पाटील 2.5 लाख रुपये संजय अडकमोल यांना दिले मात्र अनेक महिने होऊन ही आपल्याला नोकरी मिळत असल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाली असल्याची खात्री पटली त्या मुळे या चोघांनी मोठ्या हिमातीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा दोन दिवस पासून प्रयत्न केला. अखेर आज पत्रकार परिषदेचे धमकी दिली त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणामुळे आणखीन 50 पेक्षा अधिक तरुण देखील तक्रार कारण्यासाठी पुढे येत असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरदेवळा व्हाया श्रीरामपूर कनेक्शन
श्रीरामपूर येथील शरद गायकवाड याची डिफेन्स अकेडमी असल्याची माहिती या तरुणांनि दिली आहे. त्यांचा दलाल म्हूणून संजय अडकमोल जिल्यात सैन्यभरती बाबत प्रसिद्ध असल्याचे या तरुणांनी पोलिसांना दिली आहे. मात्र संजय अडकमोल यांनी कलमडूचा बेरोजगार तरुण हाताशी धरल्याने किमान 50 स तरुणांच्या कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा प्राथमिक अंदाज या पालकांकडून व्यक्त केला जातो आहे बोगस नियुक्ती पत्र व बोगस मेडिकल तपासणी याच बरोबर या मुलांना मेघालय व दिल्ली येथे नेऊन आर्मीच्या अधिकृत छावण्या बाहेर खोट्या तपासण्या केल्या असल्याने या टोळीत आणखी किती भामटा चा सहभाग आहे. त्यांची नावे लवकरच बाहेर येणार आहेत. यात काही लोकप्रतिनिधी व काही अधिकारी आहेत काय याचा सखोल चौकशी करण्याचे आव्हान पोलीस प्रशासन उभे राहिले आहे.

अखेर गुन्हा दाखल
कलमडू व आजूबाजूच्या परिसरात अनेकांची गेल्या दोन वर्षयापासून आरोपीनि संगममत करून आर्मीत भरती करून देतो, असे भासविले व तरुणांची फसवणूक केली मात्र आज दीपक मधुकर केदार रा कलमडू यांच्या फिर्यादी वरूनसुधीरसोनवणे कैलास सोनवणे व संजय अडकमोल यांचेवर मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आले आहे. 420, 461 व 471/34 याकलम अन्वये अधिक तपास उपनिरीक्षक हेमंत शिंदे करीत आहे.