फैजपूर। येथून जवळच असलेल्या मारुळमध्ये दरवर्षाप्रमाणे सैय्यद मुस्लिम बिरादरीच्या 30 जोडप्यांचे सामुहिक विवाह मारुळ अरबी मदरसा ऊरुजूल इस्लाममध्ये संपन्न झाला. यात 30 सैय्यद मुस्लिम वधू-वर विवाह बंधनात अडकले. या विवाहास मुफ्ती नूरुल इस्लाम हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख मुस्लिम मौलाना हाफिज, मधुकर साखर कारखाना चेअरमन शरद महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर, तसेच राजकीय पदाधिकारी सोहळ्यास उपस्थित होते.
येथील नागरीक होते उपस्थित
दरवर्षाप्रमाणे यावर्षीही चोपडा, सुरत, गुजरात, बलसाड, वापी, दमन, धुळे जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम सैय्यद बिरादरीचे नागरीक उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचे आयोजन मारुळ जामा मस्जिद ट्रस्टतर्फे करण्यात येते. या विवाह सोहळ्यात गोरगरीब मुस्लिम समाजातील वधू-वरांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आले.
सोहळ्याचे कौतुक
या सोहळा मुकंदर जनाब अकिल, उपसरपंच सईद आलम, वसीम इंजिनिअर, आसिफ, भुरा, इम्तियाज, तसेच गावातील सैय्यद युवा बिरादरीचे ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळते म्हणून हा मोठा सामाजिक कार्य संपन्न होते, अशी माहिती जामा मस्जिद ट्रस्टतर्फे देण्यात आली. या सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे.