सॉॅफ्ट बॉल स्पर्धेत जळगाव संघ अजिक्य

0

जळगाव : पिंपरी पुणे येथे 5वी मिनी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल स्पर्धा 9 ते 12 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जळगाव येथील बारा वर्ष वयोगटातील खेळाडुंनी सांगली संघावर मात करीत अजिक्यपद प्राप्त केले. तर 10 वर्ष वयोगटातील संघाने तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी राज्यातुन 18 संघ सहभागी होते. जळगाव संघाचे व्यवस्थापक म्हणुन गौरव पाटील यांनी तर प्रशिक्षक म्हणुन प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे यांनी काम पाहिले. विजयी संघाचे जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रिडा अधिकारी चांदुरकर, प्रा. संजय जाधव, आंतरराष्ट्रीय खेळाडु जयेश मोटे यांनी क्रीडा संकुलात खेळाडुचा सत्कार केला. तर जलसंपदा मंत्री गिरिष महाजन, आमदार चंद्रकांत सोनवणे, सुरेश खार, पी. पाटील, अ‍ॅड. प्रदिप, प्रशांत जगताप, डॉ. दिनेश पाटील, प्रा. डॉ.संजय चौधरी, किशोर चौधरी, प्रा. किरण नेहते यांनी खेळाडुचे अभिनंदन केले.

यांची होती उपस्थिती
12 वर्ष वयोगटातील संघ- कुणाल भंगाळे(कर्णधार),वेदांत धांडे, मृजाल इंगळे, अभिजीत मेठे, भुपेन चिरमाडे, अनिकेत पाटील, ओम माथोडकर, ईश्‍वर चौधरी, मानस पाटील, अभिषेक महाजन, मानस जोगी, पवन काटे, श्रेयस अवसेकर, अदम पाटील, मोहित चौधरी,शुभम जाधव सदर खेळाडू जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत चालविल्या जाणार्‍या क्रीडा प्रशिक्षण केंद्रात नियमित करीत असतात.