सोंगलापाणी गावास मुलभूत सोयीसुविधा द्या

0

नंदुरबार । अक्कलकुवा तालुक्यातील सेंगलापाणी गाव हे मुलभूत सुविधांपासून कोसोदूर असून तेथील नागरीकांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृप ग्रामपंचायत रामपूर अंतर्गत गाव सेंगलापाणी ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार हे गाव आजही शासकीय योजना व मुलभूत सोेयीसुविधांपासून वंचित आहे. गावाची लोकसंख्या सुमारेे चारशे ते पाचशेच्या आसपास आहे. गृप ग्रामपंचायत रामपूरपाडापासून 6 कि.मी. अंतरावर हे गाव वसलेले असून दळणवळणाची कोणतीही सुविधा नसल्याने आरोग्य, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहे. एवढेच नव्हे तर पाणी, आरोेग्याच्या मुलभूत गरजांपासून आजही कोसोदूर आहे. या गावात रस्ते, शासकीय योजना केवळ कागदावर असल्राचा आरोप आहे.

रस्ता जलदगतीने तयार करा
गेेल्या पन्नास वर्षापासून ह्या हालअपेेष्टा आम्ही गांवकरी सहन करत आहोत. गावात प्राथमिक शाळा असून योेग्यअशी इमारत नसल्याने कुठकाठीच्या घरात अथवा झाडांखाली कधी-कधी शाळा भरविली जाते. आजही पारतंत्र्यात व दारिद्र्यात जगत आहोत. यात आमची मुख्य समस्या म्हणजे दळणवळणाची गृप ग्रामपंचायत रामपूरपाडा ते सेंगलापाणी हा सहा किलोमीटरचा रस्ता जलदगतीने आपल्या आदेशाने करण्यात यावा. निवेदनावर सगुना वसावे, अंजु वळवी, रामसिंग तडवी, सुखराम तडवी, जगदिश वसावे, किसन तडवी, जेहा वसावे, जयसिंग पाडवी, जयवंत वसावे, रामजी वसावे, फत्तेेसिंग वळवी, भरतसिंग पाडवी, जितेंद्र तडवी, देविलाल पाडवी, रामसिंग वळवी, रविदास वसावे, दिलीप संपत तडवी, प्रकाश तडवी आदींच्या सह्या आहेत.