अमळनेर। तालुक्यातील सोनखेडी येथे 1 मे रोजी शासनाचा आदेश असूनही ग्रामसभा घेण्यात आली नसल्याने ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्यावर कारवाही करण्यासंदर्भातचे निवेदन गट विकास अधिकारी अशोक पटाईत यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सोनखेडी गावात महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायतने आठ दिवसापूर्वी अजिंडा द्वारे सर्व सदस्यांना कळविले होते परंतु प्रत्यक्षात 1 मे रोजी 10 वाजेची वेळ असतांना सरपंच, उपसरपंच व सदस्य कोणीही उपस्थित नव्हते.
मात्र सरपंच पती यांनी ग्राप शिपायाला सांगून ग्रामपंचायत कार्यालयासमोर येजा करणार्या ग्रामस्थानां बोलवून सह्या घेण्यास सुरुवात केली असता तक्रारदार प्रदीप किरण पाटील, धनंजय राजेंद्र बोरसे यांनी विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही तसा व्हिडिओ आम्ही मोबाईल मध्ये घेतला आहे ग्रामसेवकांनी प्रोसेडिंग वर गणपूर्ती पूर्ण न झाल्याने आजची सभा रद्द करण्यात आल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु तक्रारदार यांनी सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामसभा रद्द असा उल्लेख करावा तर सरपंच पतींच्या राजकीय दबावापोटी त्यांनी तशी नोंद केली नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणार्या ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यावर कारवाही करण्याची मागणी प्रदीप किरण पाटील, धनंजय राजेंद्र बोरसे यांनी गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांच्याकडे केली आहे. याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एल डी चिंचोरे यांच्याशी संपर्क साधला असता कोरम अभावी सदरची ग्रामसभा तहकूब करण्यात आली असून ती 9 मे किव्हा 11 मे रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले.