सोनगडजवळ तिहेरी भीषण अपघात; ९ जण जागीच ठार

0

नवापूर: महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सोनगड शहराजवळ पोखरण गावात गुजरात परिवहन विभागाची बस, क्रुझर आणि टँकरचा तिहेरी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता कि यात ९ जण जागीच ठार झाले. २४ जण जखमी झाले आहे. नागपूर- सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्याहद्दीत सोनगडनजीक टँकरने आल्याने कुशलगठ-सुरत-उकई बसला धडक दिली. या दरम्यान मागून भरधाव वेगाने येणारी प्रवासी क्रुझर बसला धडकली.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.