सोनगीर- शहरात दोन गटात शुक्रवारी रात्री वाद झाला. या वादातून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शेतकर्यासह दोन जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. सोनगीर येथील मरिमाय चौकात शुक्रवारी धुरळणी करतांना एका बालकाला मारहाण करण्यात आली. याबाबत काही नागरिक जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. त्यानंतर फकीर वाडा परीसरातून दगडफेक झाली. दगडफेकीला दुसर्या गटाने दगडफेकीने उत्तर दिले. दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. या वेळी वीज पुरवठा काही वेळेसाठी खंडीत झाला. दगडफेकीत शेतातून परत येणारे संजय परदेशी यांच्यासह शाहरूख शहा, सलीम शहा फकीर हे जखमी झाले. याबाबत काही नागरिकांनी सोनगीर पोलिस ठाण्यात संपर्क साधुन त्यांना घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर वारे पथकासह आले. पोलिसोंच वाहन पाहून दंगलखोरांनी पळ काढला. पोलिसांनी या प्रकरणी सहा ते सात जणांना ताब्यात घेतले आहे. जखमींवर सोनगीर रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यत पोलिसांचा बंदोबस्त होता. घटनेनंतर परीसरात तणावपूर्ण शांतता आहे.