एक कोटी एक लाखांच्या रोकडसह गावठी कट्टा जप्त : ठाण्यासह गुजरात राज्यातील आरोप
धुळे- सोनगीरजवळील सिने स्टाईल वाहनासमोर चारचाकी लावत गुजरातमधील व्यापार्याकडील दोन कोटी 92 लाख 72 हजारांची रूपयांची लूट झाल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला अटक केली असून त्यातील चार आरोपी ठाण्यातून तर तीन आरोपी गुजरात राज्यातून पकडण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून आतापर्यंत एक कोटी एक लाख पाच हजार रुपये रोख, एक गावठी पिस्तुल, तीन जिवंत काडतूस आणि कार मिळून एकूण एक कोटी 8 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
या आरोपींना केली अटक
अनिल कृष्णा सुवर्णा (52, गांजेगाव पोस्ट, डेकाले, ता.पालघर), अनिल शंकर बेताळ (50, मनोरमा नगर, घोडबंदर, ठाणे), कासीम अब्दुल शेख (31, कासारवडोली, गरीब नगर, घोडबंदर), अनिल कृष्णा सुवर्णा (52, डेकाले, पालघर), संजय अमृतलाल पटेल (32), हसमत उर्फ गोपाल भिकाबाई पटेल (26), जसमीन रतीलाल पटेल (29, सुडीया, वडनगर, जि.म्हैसाणा, गुजरात) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, पत्रकार परीषदेस अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़