सोनगीर येथे ग्राहक पंचायतीच्या मेळाव्याचा समारोप

0

धुळे । तालुक्यातील सोनगीर येथे ग्राहक पंचायतीच्या राज्यव्यापी मेळाव्यात ग्राहक पंचायतीचे जनक बिंदुमाधवराव जोशी यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, पेट्रोलपंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल देऊन लूट थांबवण्यासाठी पारदर्शक नळीद्वारे पेट्रोल मिळावे, शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ग्राहकांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी उपक्रम राबविण्यात यावे, असे तीन ठराव संमत झाले.

ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक पंचायत झोकून देऊन कार्य करेल, असे ग्राहक पंचायत राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी दिले.

मेळाव्याच्या समारोपप्रसंगी यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंजुळा गावित, सर्जेराव जाधव, मार्तंडराव जोशी, अरुण भार्गवे, डॉ. योगेश सुर्यवंशी, अविनाश महाजन, धनंजय कासार, अर्जुन वाघमारे, आर.के.माळी, मेघाताई कुलकर्णी, अनिल जोशी उपस्थित होते. रतनचंद शहा, रवींद्र महाजनी, डॉ.अजय सोनवणे, एम. टी. गुजर, डॉ कल्पक देशमुख, एल. बी. चौधरी, किशोर पावनकर, राजूबाबा पाडवी, शरद पाचपुते, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, नंदकिशोर कोठावदे, के. के. परदेशी, मनोज जैन, प्रसाद जैन, राहुल देशमुख, दीपक पाटील, कल्पेश पाटील, किशोर लोहार, विशाल कासार, श्रीराम सैंदाणे, रोशन जैन, शरद चौक, श्यामकांत गुजर, समाधान पाटील, हेमंत सोनवणे आदींनी संयोजन केले. दोन दिवसीय मेळाव्यात प्रा. डॉ. श्रीधर देसले यांनी शेतीमाल व बाजारमूल्य, अनिल जोशी यांनी ग्राहक मार्गदर्शन केंद्र, अजय भोसरेकर यांनी ऑनलाईन नोंदणी, प्रा. प्रकाश पाठक यांनी ग्राहकतीर्थ व ग्राहक पंचायत, सर्जेराव जाधव यांनी ग्राहक पंचायत कार्यपद्धती व फलश्रुती, पवन अग्रवाल यांनी जीएसटी, सुरेश वाघ यांनी वीज ग्राहक तक्रार मंच या विषयावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन शेखर देशमुख, आरीफखाँ पठाण यांनी केले.