सोनगीर। येथील आनंदवन संस्थानात 19, 20 ऑगस्ट रोजी होणार्या ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्गच्या नियोजनाची बैठक झाली.
अध्यक्षस्थानी विभागीय ऊपाध्यक्ष डॉ. योगेश सुर्यवंशी होते. रवि महाजनी, प्राचार्य श्रीराम महाजन( दोंडाईचा), डॉ.अजय सोनवणे, प्रा.चंद्रकांत डागा( शिंदखेडा), प्रा.राकेश मोरे(शिरपुर), एम.टी. गुजर आदींनी मार्गदर्शन केले. आर्थीक नियोजनाबद्दल सविस्तर चर्चा झाली. हरीसिंह चव्हाण, झमकबाई डागा, शेखर देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. कै.बाळासाहेब कुलकर्णी यांना सामुहीक आदरांजली वाहण्यात आली. प्रस्तावना डॉ कल्पक देशमुख, आभार शेखर देशमुख यांनी मानले. शरद पाचपुते, शिवनाथ कासार, ज्ञानेश्वर चौधरी, नंदकिशोर कोठावदे, के.के. परदेशी, मनोज जैन, प्रसाद जैन, राहुल देशमुख, दीपक पाटील, कल्पेश पाटील, विशाल कासार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.