सोनमने केला दुसरा विवाह

0

मुंबई : ‘त्रिदेव’ चित्रपटातील भूमिकेने व त्यातील ‘ओये ओये’मुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सोनमने पुड्डुचेरी येथील डॉक्टरसोबत दुसरे लग्न केले आहे. तिचे लग्न कसे आणि कुठे झाले याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. तिचा पहिला विवाह चित्रपट निर्माता राजीव रायसोबत 21 जानेवारी 1991 रोजी झाला होता. जवळपास 25 वर्षे सोबत राहिल्यानंतर त्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये घटस्फोट घेतला.

मागील 26 वर्षांपासून सोनम अज्ञातवासाचे जीवन जगत होती. ‘आखरी अदालत’, ‘त्रिदेव’ यासारख्या चित्रपटात काम केलेल्या सोनमने राजीवसोबत लग्न केल्यानंतर चित्रपट करणे सोडून दिले होते. राजीवने ‘गुप्त’ (1994) चित्रपट बनविला होता. याचवेळी तो अंडरवर्ल्डच्या कचाट्यात आला आणि त्यांच्या ऑफिससमोर त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना घडल्याने या दोघांनी भारत सोडून विदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पहिले लॉस एंजिलीस, स्वित्झर्लंड आणि मग काही वर्षानंतर ते मुंबईत परतले. सन 2000 पासून ते वेगळे राहत आहेत.