सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर अभिनेत्री सोनम कपूर त्यानंतर अभिनेता रणवीर सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र या दोघांना त्याचे उत्तर अमिताभ यांना दिले नाही, त्यामुळे अमिताभ यांनी नापसंती व्यक्त केली.
रणवीर सिंह याचा वाढदिवस 6 जुलै रोजी झाला. त्यानंतर 13 जुलै रोजी रणवीर ज्यांनी ज्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे तो ट्वीटरवरून आभार मानत होता. त्यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांचे आभार मानले नाही. त्यावर बच्चन म्हणाले की, वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला एसएमएस करून शुभेच्छा दिल्या होत्या, त्याचे उत्तर अद्याप आले नाही, आपण तो एसएमएस पाहिला नाही का? त्यावर रणवीर सिंह उत्तर देतांना म्हणाला की, मी सर्वांचे आभार मानले, आलेल्या शुभेच्छांचे संदेश मी पुन्हा पडताळूण पाहिले, त्यात मला शुभेच्छा देणारे तुम्ही पहिल्या व्यक्ती होतात. त्यानंतर त्याने पुढे म्हटले की, या अशा छोट्या छोट्या गोष्टीच तुम्हाला मह ान बनवत आहेत. याआधीही अमिताभ बच्चन यांनी सोनम कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएसद्वारे दिल्या होत्या. मात्र सोनमनेही त्याला उत्तर दिले नाही. तेव्हाही अमिताभ बच्चन यांनी डियर मी अमिताभ बच्चन आहे. मी तुम्हाला तुमच्या जन्मदिवशी शुभेच्छा दिल्या, मात्र तुम्ही उत्तर दिले नाही. त्यानंतर सोनम कपूरने ओह माय गॉड सर, मला एसएमएस मिळाला नाही, मी नेहमी उत्तर देत असते. मी तुमची आभारी आहे, मला क्षमा करा.